Wednesday, 10 April 2024

मुखवटा आवश्यक आहे, हा सोशल इंजिनिअरिंगचा महत्वाचा मुद्दा आहे. - ॲड शिवाजी डमाळे

मुखवटा आवश्यक आहे, हा सोशल इंजिनिअरिंगचा महत्वाचा मुद्दा आहे.



श्री बलबीरसिंह परमार साहेबांनी सैनिक समाज पार्टीचे रजिस्ट्रेशन करतांना स्वतःचा मुखवटा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुढे केला आहे.


मला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली म्हणून मी माझा मुखवटा पुढे केला आहे.


सैनिक समाज पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यास तयार असलेल्या उमेदवारांना त्यांच्या क्षेत्रात मुखवटा व मोबाईल नंबर सह व्हायरल केल्यामुळे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार म्हणून लोकप्रिय होत चालले आहेत.


जळगाव जिल्ह्यात ईश्वर मोरे साहेब

नाशिक जिल्ह्यात सौ जयश्री ताई महेंद्र पाटील

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात तुकाराम डफळ

पुणे जिल्ह्यात कर्नल सुरेश पाटील


यांचे मुखवटे पुढे केल्यामुळे मतदारं त्यांना ओळखू लागले आहेत.म्हणुन सजग सज्जन सुशिक्षित ईमानदार देशभक्त टॅलेंटेड नागरीकांनी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्पखर्चात निवडून देणार असल्याचे संकेत दिले आहेत.


ॲड शिवाजी डमाळे

प्रदेशाध्यक्ष

सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र 

9850290237

सैनिक समाज पार्टीचा आवाज म्हणजे आम समाजाचा आवाज आहे. - ॲड शिवाजी डमाळे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा आवाज आहे.



श्री बलबीरसिंह परमार साहेबांनी आम समाजातील नागरीकांना आमदार खासदार मंत्री करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे रजिस्ट्रेशन केले आहे.


आम समाजातील सुशिक्षित ईमानदार देशभक्त टॅलेंटेड नागरीकांना राजकारणात आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे ध्येय आणि उद्दिष्टे आहेत. 


सैनिक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि आम समाज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची रयत होय.


मावळे+रयत यांचे मिश्रण म्हणजे सैनिक समाज पार्टी होय.


लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य प्रत्यक्षात उतरवून जनतेचे सरकार म्हणजे जनलोकतंत्र आणण्यासाठी सैनिक समाज पार्टी प्रयत्न करत आहे. 


सैनिक समाज पार्टीचे कोणीही विरोधक नाही. अगदी कोणत्याही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सैनिक समाज पार्टी मध्ये प्रवेश करू शकतात. 


पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत कर्नल पाटील साहेब आणि तुकाराम डफळ साहेब हे जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवार म्हणून सैनिक समाज पार्टी तर्फे पुढे केलेले आहेत.


कर्नल सुरेश पाटील साहेबांनी १९९३ पासून घरदार विकून समाजसेवेचे वृत्त घेतले आहे. आणि पाणी वृक्षलागवड,पर्यावरण या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.


तर तुकाराम डफळ यांनी शिरूर तालुक्यातील १२ गावाच्या पाणी प्रश्नासाठी पायाला भिंगरी लावून स्वतःच्या खिशातून पेट्रोलचा खर्च करून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. 


कर्नल पाटील साहेब,जनसेवक तुकाराम डफळ, ईश्वर मोरे साहेब, जयश्री पाटील मॅडम,बि टी पाटील साहेब आणि मी ॲड शिवाजी डमाळे प्रदेशाध्यक्ष सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र यांना आम समाजातील मतदारच सैनिक समाज पार्टीचे खासदार म्हणून निवडून देऊन संसदमध्ये पाठविणार आहेत.


ॲड शिवाजी डमाळे

प्रदेशाध्यक्ष

सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र 

9850290237

आत्ताच्या निवडणुका म्हणजे चुटु पुटूच्या लढाया आहेत? - ॲड शिवाजी डमाळे

 आत्ताच्या निवडणुका म्हणजे चुटु पुटूच्या लढाया आहेत?


सैनिक समाज पार्टी,एक अनोखी पार्टी आहे,

सैनिक समाज पार्टी,एका अनोख्या पद्धतीने निवडणुका जिंकणार आहे.


१९८० साली स्थापन झालेल्या भाजपाचे १९८४ मध्ये फक्त दोनच खासदार निवडून आले होते? 


भाजपाचा आलेख कसा वाढत गेला? आणि २०१४ मध्ये स्वबळावर सरकार आणू शकले? 


सैनिक समाज पार्टी तर्फे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी,अशा भाजपाचा पाया भक्कम करणाऱ्या नेत्यांच्या रणनितीचा अभ्यास करत आहोत.


*सैनिक समाज पार्टी, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे शिवकालीन स्थळाला भेटी दिल्या जातात.


मी आज दिं.९/४/२०२४ रोजी थोरले माधवराव पेशवे, आणि त्यांच्या मागे सती गेलेल्या त्यांच्या पत्नी महाराणी रमाबाई यांचे समाधीस्थळ असणारे थेऊर जि पुणे येथील गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आलो आहोत.


थोरले माधवराव पेशवे यांच्या पासून प्रेरणादायी स्फुर्ती घेऊन महाराष्ट्रात सैनिक समाज पार्टीचे सरकार आणण्यासाठी श्रीगणेशाचे आशिर्वाद घेऊन आलो आहोत.


ॲड शिवाजी डमाळे

प्रदेशाध्यक्ष 

सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र 

9850290237